मित्रा, संस्था नाशिकरोड रेल्वेस्टेशन पासुन जवळच 5.0 एकर जागेत वसलेली आहे. मित्रा एक 'उत्कृष्टता केंद्र' म्हणुन विकासाच्या कामातील महत्वाचा भाग म्हणजे मित्राच्या मुलभुत सोईसुविधांचा सक्षमपणे विकास होणे. याअंतर्गत मित्रा परिसरात एक प्रशिक्षण इमारत, एक प्रशासकीय व प्रशिक्षण इमारत, अद्ययावत वसतीगृह, संचालकांचे निवासस्थान, कर्मचारी निवासस्थान, अस्तित्वातील सोईसुविधांचे नुतनीकरण, सौरउर्जा व्यवस्था, परिसर सुशोभिकरण इ. कामे पुर्ण झाली आहेत. यामुळे मित्राच्या मुलभुत सोईसुविधांमध्ये वाढ होऊन नविन वसतीगृहातील अद्ययावत वातानुकुलीत सुविधांचे '215' व्यक्तिंसाठी राहण्याची सुविधा, जुन्या वसतीगृहात ''70 व्यक्तींची राहण्याची सुविधा, द्रुकश्राव्य अद्ययावत सुविधा असलेल्या '13' वर्गखोल्या, '4' संगणक वर्गखोल्या (40 व्यक्तिंसाठी) आणि '220' व्यक्तिंसाठीचे अद्ययावत सेवासुविधांसहचे सभागृह उपलब्ध झाले आहे.
Fill The Below Form and Star Searching